Other‎ > ‎

मराठी

(This material  is NOT part of the web book 'Wandering Wonderings')
------------------------------------------------------------------------
कल्पनेचा प्रवाह

वार्‍याची झूळुक येते जाते, कल्पनेची झूळुक येते जाते
फरक एवढाच, कल्पना वाहिली की 
मला, काळाला आणि जगाला  अस्तित्व येत

मी असा-तसा, हे केल, ते केल, आलो-गेलो
काल, आज, उद्या, मघाशी, नंतर, कधीतरी
जग--->  खर-खर, स्वप्नगत, आहे-नाही

कल्पना खेळायची थांबली, की सगळ वीसावत
मी, काळ, जग, प्रश्न, उत्तरा, चूक, बरोबर,
चिंता-भीती, जन्म-मृत्यू, हे अर्ध-कवित्व 

-----------------------------------------------------------------------
जाणीव कुठे असते?

खगोलात?
पण खगोल, त्यातील चंद्र, तारे,  ग्रह
तर जाणीवेतच जाणवतात

काळात?
पण आज, काल, उद्या, नंतर या कल्पना
तर जाणीवेतच जाणवतात

इँद्रियात?
पण कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा
तर जाणीवेतच जाणवतात

मेंदूत?
पण मेंदूतील विद्युत-रासायानिक प्रक्रिया
तर जाणीवेतच जाणवतात

जाणीव कुठे असते, तीची जाणती किंवा जाणता कोण
हे प्रश्‍न, ही अर्ध-कविता, ही जाणीवेतच जाणवतात
प्रश्न दमून झोपले की मग राहते फक्त - प्रत्यक्ष उत्तर
-----------------------------------------------------------------------
भातुकली

जाणीव विवीध पण क्षणीक देखावे जाणवीते
कल्पना त्याना अर्थ देते - ही जाग, ते स्वप्न, 
ही गोदु, तो सोम्या, हा दगड, तो हीरा,
हे खर, ते खोट, थोर, मूर्ख, सुख, दुख्ख

क्षणीक देखाव्याचा कंटाळा आला की
कल्पना जाणीवेचे क्षण गोष्टीनी जोडते
गोष्ट म्हणजे काळ - उद्या, काल, केव्हातरी,
पाहिजे, युग, चिंता, पश्चाताप, आशा

कल्पना जाणीवेत जाणवीते
"जाणीव" ही न-जाणीव सापेक्ष कल्पना
दोघी एकच, खेळापूरत्या भीन्न
शून्यातून विश्व; या ओळीही गोष्टच

-----------------------------------------------------------------------

तो मी नव्हेच

अस वाटायचा, हे शरीर, त्याच वागण, 
विचार, भावना, संवेदना, म्हणजे मी
मग लक्षात आल की ते तर केवळ संस्कार
आई, बा, आजी, मावशा, काकानी केलेले
शिकवलेले शब्द बोलू लागले, यंत्रमानव,
हा मी, ते मी केल, हे माझ,  ते आवडत

सगळ आपोआप घडल, घडत आहे, घडेल,
पण या सगळ्याची जाणीव कुणाला तरी आहे
बघणारा, ऐकणरा, शब्दाचे अर्थ समजणारा,
किमान तो तरी मी असेन? छे हो, कुठल काय!
जाणीव जाणवते, पण "कोणाला"  हे संस्कार
मी ऐकल, मी बघितल, मला कळल, जाणवल

मग मी कोण?
"मी" हा शब्द आहे
शब्द गप्प झाले की प्रश्न जातात, उत्‍तरांची गरजही
उरत ते "आहे" ही नाही, "नाही" ही नाही, ते ही शब्दच
आम्ही कोण म्हणूनी काय पुसता,
आम्ही असू.............................
----------------------------------------------------------------------

श्रद्धा

देवावर, गुरूवर, शास्त्रीय पद्धतीवर, आणखीन कशावर
पण सगळ्यांची जगावर = जाणीवे बाहेरील अस्तीत्वावर
आणि स्वतःवर, म्हणजे वरील श्रद्धा ठेवण्यार्‍यावर

शब्दाबरोबर येणारी,  शब्दाबरोबर ढळणरी श्रद्धा
हा मी, मी जन्मलो, मी जगतो आहे, मी मरणार
सुख-दुखंचे धुंद नृत्य, कल्पनेच्या मुग्ध तालावर

जर ती स्वतःवरची श्रद्धामूळ श्रद्धाच संपूर्ण ढळली तर? 
कोण जन्मेल, जगेल, मरेल; कोण ठेवेल बाकीच्या श्रद्धा?
"मूळ श्रद्धा ढळल्यावर काय उरत ?" अस कोण विचारेल?
----------------------------------------------------------------------
हितगुज

ना काही सिद्ध करायचा, ना काही पटवून द्यायचा
ना सत्य-असत्य, ना चूक-बरोबर, ना चांगल-वाईट
ना व्यावहारिक प्रश्न सल्ला, किंवा अजून काही 

खरच, अगदी खर, मला काहीच सांगायाच नाही
कोणाला सांगू ? माझयाच जाणीवेतील कल्पनाना ?
आणि तरीही सांगायला जाव तर सांगणच आड येत !
----------------------------------------------------------------------
दर्शन

जाणीवे बाहेर कधी काही जाणवल आहे?
बघितल, ऐकल, स्पर्शल, चाखल, गंधल,
कल्पनेचा अर्थ, जागेपण, स्वप्न, स्वदेह?

कल्पने बाहेर कधी काही कल्पिल आहे?
जाणीवे बाहेरील अस्तित्व, झोप, मी-तू,
काल-उद्या, प्रश्न-उत्तर, जन्म-मृत्यू, या ओळी?

जाणीव जाणवण्यास, कल्पना कल्पिण्यास काही केल?
विचार केला, प्रयत्न, कष्ट केले, अस वाटल
तेही जाणीवेत जाणवल, कल्पनेने कल्पीवल 
-----------------------------------------------------------------------
शब्दांत

शब्दांच्या भाषेत- जागेत, स्वप्नात जाणीव असते
झोपेत, जन्माआधी आणि मृत्यू नंतर नसते
शब्दार्थकाळ आणि तो जाणणर्‍या स्व चा भास

शब्दावीना, ना सांगायला कोणी, ना सांगायला काही,
जाणीव आहे-नाही असा काल्पनिक फरकही 
जे उरत त्याला उरत म्हणण ही  शब्दांची शेवटची खेळी
-----------------------------------------------------------------------
अगम्य खेळ

शब्दांचा खेळ त्यांच्या नकळत चालू झाला
आहे-नाही ही नव्हता त्याचा "मी आहे" झाला
खेळातच जाणवला जगाचा, सुख-दुखांचा भास
खेळातच शब्दांना शब्दांचा खेळ ध्यानात आला

खेळातच शब्द-परिणामापासून मुक्ततेची धडपड
खेळातच शब्द-परिणामातू सुटलेल्यांचे वर्णन -
"शब्दांवरुन लक्ष सांडले आणि ते निशब्दाकडे लागले"
शब्दांना  हे शब्द पूर्णपणे समजले, पण ना उमजले
खेळातच 'आपण काही करू शकत नाही' मात्र कळले

खेळातच शब्द अगदी, अगदी  अगतिक होतात
ना निर्मीती माहीत, ना जाणता, बापडे वाहतात
थकून थोडे थांबले की स्वतःपासूनच विसावतात!
खेळ चालूच राह्तो, हे अर्ध-काव्य त्याचाच भाग
-----------------------------------------------------------------------
हावरट

मी मागीतल, तू दिलस- खाऊ, खेळणी, कुत्र्याच पिल्लू,
छान शिक्षण, नोकरी, छोकरी, पुरेसा पैसा, जग-दर्शन,
केल्या कामाच समाधान,  स्रूष्टीचे शास्त्रन्यान, बरच काही

मी विचारल तुझया खेळाच सार, तू सांगीतलस 
तुझात खेळणारे शब्दच माझा स्व-पणाचा, 
जगाच्या खरेपणाचा, सुख आणि दुखांचा भास

आता एकच मागण, हाव, शेवटची
दे स्वातंत्र्य त्या शब्दभासापासून
माझया न-संपणार्‍या हावेपासून
--------------------------------------------------------------------
गंमत (essence of everything written to date)

विचारांचे अस्तित्व जाणवत पण निर्मिती नाही
ते  नकळत प्रगट होतात आणि भासवतात
स्व, त्याची कहाणी, जग आणि त्यांचे खरेपण

विचरांशीवाय जे उरते, ते वीनाभास 
तेच विचारांच्या उपस्थितीतही असते
फक्त विवीध काल्पनिक मुखवट्यात

हे कळल्यानी विचार-भास थांबत नाही
तो थांबावा अशी तीव्र इच्छा मात्र होते
ते ही विचारच आणि हेही- प्रगट झालेले
------------------------------------------------------------------------
अवस्था

बुद्धीचे काम संपले, आपली मर्यादा ओळखली
यापुढे आपण काही करू शकत नाही हे कळले
आपण कधीही काहीही केलेले नाही हेही कळले
आता फक्त अस्वस्थता= आतुरतेने वाट बघणे
कशाची? पोकळीतील वाट बघणे संपायची :-) 
--------------------------------------------------------------------
सोपा सारांश 

विचार नकळत प्रगट होतात, आणि 
भासवतात स्व, जग, त्यांचं खरेपण 
विचाराविना, ना- स्व, जग, खरं-खोट  
हे ही विचारच, नकळत प्रगट झालेले
-------------------------------------------------------------------
गंमत 

विचारांचे अस्तित्व जाणवत पण निर्मिती नाही
ते  नकळत प्रगट होतात आणि भासवतात
स्व, त्याची कहाणी, जग आणि त्यांचे खरेपण

विचरांशीवाय जे उरते, ते वीनाभास 
तेच विचारांच्या उपस्थितीतही असते
फक्त विवीध काल्पनिक मुखवट्यात

हे कळल्यानी विचार-भास थांबत नाही
तो थांबावा अशी तीव्र इच्छा मात्र होते
ते ही विचारच आणि हेही- प्रगट झालेले

----------------------------------------------------------------------

समाधान

विचार जोपर्यंत प्रगट होत नाहीत 
तोपर्यंत नसतो स्व, ना त्याच जग 
ना सुख, ना शंका, चिंता, ना गरज 
म्हणजे असतं सुखवीना समाधान 

जोपर्यंत शरीर आहे, विचार असणार 
पण त्यांचा अर्थ भाजलाच पाहिजे का?  
हव, नको, विरोध झालाच पाहिजे का? 
विचार आणि समाधान नांदू शकतील?

कोणाला हव आहे अस समाधान?
प्रगट विचारांनी भासवलेल्या स्व-ला,
कधीही अस्तित्वात नसलेल्याला!
भ्रम भ्रमाचा भ्रमनिरास कसा करणार? 

-------------------------------------------------------------------
जेथे जातो तेथे

जेथे जातो तेथे तू सांगाती 
चालविशी हाती धरुनिया

आधी ना होतो, ना नव्हतो 
भासाविलेस 'मी आहे' ऐसे

मग केलीस करमणूक मोठी 
भटकविलेस उत्तरांच्या शोधा 

विचार पेरूनी दावीयलेस उत्तर 
हा केवळ खेळ विचार अर्थांचा

परी स्व-त्वाचा भ्रम चालूच राहे 
कासावीस जीव,आस क्षणा वाढे

बोटे हलवून हे शब्दही लिहवीशी
निखिल म्हणे, का लावीसी वेळ? 

(आस = तहान)
---------------------------------------------------------------------

तुका आणि मी


"भेटी लागी जीवा, लागलीसी आस"
तुकाचीही स्थिती होती, माझी आहे 

दोघही व्यवस्थित जाणतात की 
आपण काहीही करू शकत नाही 

तुकाचा विश्वास म्हणतो, भेट होणारच 
माझ अज्ञान म्हणत,  कदाचित होईल

दोघही तहानेने कासावीस 
एक शांत, दुसरा अस्वस्थ 

जीवनाच्या वाहण्याचे 
दोन नमुन्याचे  प्रवाह

--------------------------------------------------------------------

अगम्य

शब्दावरून लक्ष उडे, नि:शब्दावर लागे,
हा एक संकेत आहे, एक संत वर्णन आहे 

शब्दावर लक्ष म्हणजेच स्व-चा भास 
एक भास तो लक्षबदल कसा करणार?

मग हे कळूनही कळकळ , धडपड का?
कारण, तो ही अगम्य खेळाचाच भाग!
----------------------------------------------------------------------

देसी असा मार्ग

विचार अपोआप प्रगट  होतात, कळल
विचारांचा अर्थ म्हणजे स्व-भास, कळल 
विचार वाहणं सहसा थांबत नाही, कळल 
विचार-कल्पना फक्त ओळखायची, नाही कळल, 
पण ते विचारांच्या आवाक्यातल नाही, हे कळल!
आता फक्त पोकळीत वाट बघायची, कारण
 दिलीस भक्ती, खात्री, प्रार्थना, ओलावा 
 दिलीस जप, ध्यानाची आवड, कुवत!  
----------------------------------------------------------------------

बोध

अस्तित्व जाणवत, शब्दाविना, तो बोध 

मी व्यक्ती हा भास, एक शब्दार्थ, नाही बोध 
'मी केवळ कल्पना', आज शब्दार्थ, नाही बोध 

शब्दार्थ केवळ शब्दार्थ, हा होई जेव्हा बोध, 
तेव्हा शब्द न राही केंद्र, होई जाणीवेत मेघ 

शब्द म्हणे, मेघासाठी लागे सदगुरू प्रकाश  

(सदगुरू = not "me"= life, existence) 
----------------------------------------------------------------------
भिक बोधाची

विचार जे सांगतात तेवढीच मला माहिती -
मी कोण, जग खरं-खोट, घटना का, कशी 
अगदी हे लिखाण सुद्धा त्यांचीच हो देणगी 

पण ते कसे, कुठून येतात, त्यांनाच नाही माहीत! 
म्हणजे, मला जे, जे  माहिती - ती केवळ कहाणी 
म्हणजे, मला काहीही समजत नाही, शून्य!

नको पैशानी मिळणार, नको बुद्धी ज्ञान, 
आता जाणीवेत आहे लाट भिक बोधाची! 
जन्माआधी, रात्री, २ लाटांमध्ये, नव्हती 

(Bodh = understanding without words/thoughts) 
----------------------------------------------------------------------

सारांश


विचारांचं अस्तित्व जाणवत पण निर्मिती नाही. असे प्रगट होणारे विचार म्हणजे प्रत्यक्ष न जाणवणार = भासणारं, सगळ

प्रत्यक्ष जाणीवेबाहेरील जग, बाकीचे जाणीवधारी जीव, काळ, न-अस्तित्व उदा. गाढ झोप, स्व=एक शरीर मर्यादित/स्वतंत्र व्यक्ती, इ. 

अर्थात, भासणार सगळ दोन विचारांमधे लय पावत!


विचाररहीत स्थिती= विचारांचा उगम आणि लय. ती विचारांबरोबर लय नाही पावत- 'शरीर मर्यादित स्वत्वाचा भास' पावतो तशी ! 

ती प्रत्यक्ष, सगळ्यात घनिष्ट, पुरावा न लागणारी आहे. विचारांच्या संगतीत ही ती, तीच असते- पण विचारांच्या विविध मुखवट्यात 

सहजसहजी ओळखू येत नाही. मुखवटे- जागृत जग vs. स्वप्नगत जग, शरीर मर्यादित मी vs. तू, भूत vs. भविष्य, इत्यादी.


-----------------------------------------------------------------------
© 2013  Nikhil Tikekar (nikhil_tikekar@hotmail.com)